पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

Updated: May 9, 2015, 07:43 PM IST
पंतप्रधान मोदींनी केला विमा आणि पेन्शन योजनेचा शुभारंभ title=

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी तीन सामाजिक सुरक्षा योजनांचा शुभारंभ केलाय. यावेळी, त्यांच्यासोबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील उपस्थित होत्या. या योजनांमध्ये एक पेन्शन योजना आहे तर दोन विमा योजनांचा समावेश आहे. 

पंतप्रधानांच्या या महत्त्वकांक्षी योजनेचा शुभारंभ वेगवेगळ्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मुंबई, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लखनऊमध्ये, परदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी भोपाळमध्ये, शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी वाराणसीत, खाद्य मंत्री रामविलास पासवान यांनी पाटणामध्ये तर रस्ते परिवहन तसंच राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भागलपूरमध्ये या योजनांची सुरुवात केली. या कार्यक्रमात वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित झाले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी, गरिबांमध्ये पोहचल्याविना विकास अपूर्ण असल्याचं म्हटलंय. जन धन योजनेत १५ करोड खाते उघडले गेले. गरिबांमध्ये खूप श्रीमंती असते... त्यांना आधार नाही तर शक्ती हवीय, असंही यावेळी पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.