वाराणसीमध्ये पंतप्रधानांचा रोड शो

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमध्ये जोरात प्रचार सुरु आहे. सलग दुस-या दिवशी त्यांनी रोड शो केला.

Updated: Mar 5, 2017, 11:29 PM IST
वाराणसीमध्ये पंतप्रधानांचा रोड शो title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीमध्ये जोरात प्रचार सुरु आहे. सलग दुस-या दिवशी त्यांनी रोड शो केला. मोदींच्या या रो़ड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. मोदींनी पांड्येपूर ते काशी विद्यापीठापर्यंत मेगा रोड शो केला. यावेळी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती.

मतांचा जोगवा मागण्यासाठी मोदी मतदारांपर्यंत या रोड-शोच्या माध्यमातून पोहचतायत. या रोड शोनंतर पंतप्रधान मोदी यांची काशी विद्यापीठाच्या मैदानात जाहीर सभा झाली.

या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस नावाचा पक्ष होता हे शोधण्यासाठी पुरातत्व विभागाची स्थापना करावी लागेल असं मोदी म्हणालेत. आता मतदारराजा भाजपाला भरभरुन मतदान करणार का ते निवडणुकांच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, उत्तरप्रदेशमध्ये अखेरच्या टप्प्याच्या 40 जागांसाठी मतदान होणार आहे. 2012 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत याठिकाणी समाजवादी पक्षानं 23 जागा जिंकल्या होत्या.