देहव्यापारात अडकलेल्या आठ मुलींची सुटका

राजधानी दिल्लीमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये आठ मुलींची सुटका करण्यात आलीय. 

Updated: Sep 10, 2014, 01:53 PM IST
देहव्यापारात अडकलेल्या आठ मुलींची सुटका title=

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये आठ मुलींची सुटका करण्यात आलीय. 

इथं मानव तस्करीचं प्रकरण पुढं आलं होतं आणि जबरदस्तीनं मुलींना वेश्याव्यवसायात धकललं जात होतं. पोलिसांनी सांगितलं की, काल संध्याकाळी सेंट्रल दिल्लीतील जीबी रोडवर पाच नेपाळी मुलींना सोडवण्यात आलं. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोडविण्यात आलेल्या मुलींचा दावा आहे की त्या सर्व वयस्क आहेत आणि अनेक दिवसांपूर्वी त्यांची तस्करी केली गेलीय. सर्वांना मेडिकल परीक्षणासाठी पाठवण्यात आलंय. मात्र याप्रकरणी अजून कोणालाही अटक केली गेली नाहीय. 

तर दुसऱ्या घटनेत पूर्व दिल्लीच्या शकरपूर भागात शुक्रवारी एका अल्पवयीन मुलीसह इतर तीन मुलींनाही सोडवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की, सर्व मुली झारखंडच्या आहेत आणि त्यांनाही ह्युमन ट्रॅफिकिंग करून दिल्लीत आणलं गेलं आणि जबरदस्तीनं एका खोलीत बंद करून ठेवलं गेलं. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून कपिल देव चौधरी नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.  
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.