राजकीय पक्षांना करसवलतीची मेहबान

राजकीय पक्षांना मागील पाच वर्षात तब्बल अडीच हजार कोटी रूपयांची करमाफी दिली गेल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.प्राप्तीकर खात्यानं दिलेल्या या खैरातीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस आणि भाजपला झाला आहे. मागील पाच वर्षात काँग्रेसला १३८५ तर भाजपला ६८२कोटी रूपयांची करमाफी प्राप्तीकर खात्यानं दिलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Dec 3, 2012, 11:15 AM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
राजकीय पक्षांना मागील पाच वर्षात तब्बल अडीच हजार कोटी रूपयांची करमाफी दिली गेल्याची बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.प्राप्तीकर खात्यानं दिलेल्या या खैरातीचा सर्वाधिक फायदा काँग्रेस आणि भाजपला झाला आहे. मागील पाच वर्षात काँग्रेसला १३८५ तर भाजपला ६८२कोटी रूपयांची करमाफी प्राप्तीकर खात्यानं दिलीय.
मायावतींच्या बहुजन समाज पार्टीनेही १४७ कोटींची करमाफी मिळवून घेतली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसही यात मागे राहिलेला नाही. मागील पाच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही१४१कोटींची करमाफी मिळवली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला८५ कोटींची तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाला २८ कोटींची करमाफी देण्यात आली. बिहारमध्ये भाजपचा सहयोगी पक्ष जेडीयूलाही पंधरा कोटींची करमाफी देण्याचं औदार्य प्राप्तीकर खात्यानं दाखवलं.
देशातील सामान्य जनता दिवसेंदिवस महागाईच्या ओझ्याखाली दबली जात असताना प्राप्तिकर विभागाने देशातील प्रमुख राजकीय पक्षांना सवलतीची खैरात केल्याचे आज उघड झाले. प्राप्तिकर विभागाने देशातील दहा प्रमुख राजकीय पक्षांना गेल्या ५ वर्षांमध्ये सुमारे २ हजार ४९० कोटी रुपयांची करसवलत दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. यात काँग्रेसला भाजपपेक्षा दुप्पट करसवलत मिळाल्याचे स्पष्ट झाले. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाला (जेडीयू) २००८-२००९ या वर्षात १५.५१ कोटी रुपयांची करसवलत मिळाली; तर बसपला तीन वर्षांमध्ये १४७.१८ कोटींची करसवलत मिळाली आहे. बसपने२००९-२०१० मध्ये अपूर्ण रिटर्न दिले आहे, तर २०१०-२०११ मध्ये करसवलतीसाठी उत्पन्न दाखविलेले नाही.
मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाला (माकप) करसवलत मिळाली. मात्र, त्यांनी २००८-२००९ मध्ये उत्पन्न दाखविले नव्हते. रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला (एलजेपी) २००७ ते २०११ या वर्षांमध्ये२.५५ कोटींची करसवलत मिळाली आहे; तर लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (आरजेडी) २००८ ते२०११ या वर्षांत २.८५ कोटींची करसवलत मिळाली.