रेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू

रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.

PTI | Updated: Nov 13, 2015, 10:48 AM IST
रेल्वेचे तिकिट कॅन्सल दर दुप्पट, नवे नियम लागू title=

 नवी दिल्ली : रेल्वेने आपला गल्ला जमविण्यासाठी छुपा अजेंडा लागू केलाय. त्यामुळे आता रेल्वेचे तिकिट रद्द करावयाचे असेल तर तुम्हाला दुप्पट पैसे द्यावे लागतील. त्यामुळे तिकिटाची रक्कम आपल्या हातात तोकडीच पडेल. त्यामुळे प्रवास करण्याचे पक्के झाले तर तिकिट काढा आणि पैसे वाचवा.

गुरुवारपासून देशात रेल्वे तिकिट रद्द करण्याबाबत नियम लागू आले आहेत. त्यामुळे तिकिट रद्द करण्याचा आकार आता दुप्पट झालाय. नियोजित वेळेच्या चार तासांपूर्वी रद्द करण्यात आलेल्या तिकिटांचाच परतावा मिळणार आहे. त्यामुळे अनेकांना वेळेचे नियोजन पाळता आले नाही तर पैशावर पाणी सोडावे लागेल.

गाडी सुटल्यानंतर काहीही परतावा मिळणारनाही. त्यासाठी चार तास आधी तिकिट रद्द करणे आवश्यक आहे. तरच पैसे मिळतील, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलेय.

द्वितीय श्रेणीचे कन्फर्म तिकिट ४८ तासांपूर्वी रद्द केल्यास ३० ऐवजी ६० रुपये, एसीटे तिकिट रद्द करण्यासाठी ९० रुपयांऐवजी १८० रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे द्वितीय श्रेणीचे स्लीपर क्लास तिकिट रद्द करण्याचा आकार ६० रुपयांवरून १२० रुपये करण्यात आलाय. तर सेकंड एसीच्या तिकिटांसाठी १०० रुपयांऐवजी थेट २०० रुपये मोजावे लागतील. तर वेटिंग लिस्टमधील तिकिटांचा परतावा मिळवण्यासाठी ही तिकिटे नियोजित वेळेच्या किमान अर्धा तास आधी रद्द करणे आवश्यक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.