झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांचा निधी

झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Updated: Sep 10, 2016, 06:52 PM IST
झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाखांचा निधी  title=

नवी दिल्ली : झाकीर नाईकच्या एनजीओकडून राजीव गांधी ट्रस्टला 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. झाकीर नाईकच्या एनजीओनं दिलेला हा निधी त्यांना परत करण्यात आल्याचं काँग्रेसनं सांगितलं आहे. ढाक्यामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा निधी परत करण्यात आला अशी माहिती इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचे प्रवक्ते आरिफ मलिक यांनी दिली आहे. 

नाईकच्या एनजीओनं 2011मध्ये राजीव गांधी ट्रस्टला हा निधी दिला होता. 2002मध्ये राजीव गांधी ट्रस्टची स्थापना झाली होती. उत्तर प्रदेश आणि हरियाणामधल्या ग्रामीण भागातल्या गरिबांच्या विकासासाठी ही ट्रस्ट काम करते. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवींनी निधी मिळाला असल्याचं मान्य केलं आहे. राजीव गांधी ट्रस्टनं त्यांच्याकडे निधी मागितला नसल्याचंही सिंघवी म्हणाले आहेत.