भाजप-आरएसएसनं आळवला पुन्हा एकदा `राम`राग!

भाजपनं पुन्हा आळवलाय `राम`राग... पाहा काय म्हणतायत राजनाथ सिंग आणि संघाचे मोहन भागवत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 7, 2013, 02:43 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
भाजपला पुन्हा एकदा आठवण झालीय ‘रामा’ची... महाकुंभ मेळ्यात संतांच्या संमेलनात बोलतानना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंग यांनी राम मंदिर बांधण्याला प्राधान्य देण्याची पुन्हा एकदा मागणी केल्यानंतर आज आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही `राम ही देशाची अस्मिता` असल्याचं म्हटलंय.
‘मंदीर वही बनायेंगे’चा पुन्हा एकदा नारा देत रामजन्मभूमीवरच राम मंदिर बनावं अशी मागणी बुधवारी राजनाथ सिंग यांनी केली. याआधीच विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी केंद्र सरकारला मंदिराबाबत जुलैपर्यंत वेळ देत मान्सून सत्रात याबाबतचा कायदा आणण्याची मागणी केली होती.

राजनाथ सिंह यांच्यानंतर आज सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राम मंदिराचा मुद्या अधोरेखित केलाय. राम ही देशाची अस्मिता आहे आणि ही अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी राम मंदिर उभारण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं भाजप पुन्हा रामाच्या भरोशावरच आगामी निवडणुका लढवणार की काय? अशी चर्चा आता जोर धरू लागलीय.