नोकरी : बारावी पास मुलांसाठी ८० हजारांच्या नोकरीची संधी!

एअर इंडियानं १८० पदांसाठी 'ट्रेनी पायलट' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित केलीय. 

Updated: Aug 15, 2015, 04:15 PM IST
नोकरी : बारावी पास मुलांसाठी ८० हजारांच्या नोकरीची संधी! title=

मुंबई : एअर इंडियानं १८० पदांसाठी 'ट्रेनी पायलट' या पदाच्या भरतीसाठी जाहिरात प्रदर्शित केलीय. 

'आयजीआरयूए'द्वारे सीपीएल धारक श्रेणीतील ९० पदं आणि इतर सीपीएल धारक श्रेणीतील ९० पदांसाठी ही भरती होणार आहे.  

शिक्षण
उमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून गणित, भौतिक शास्त्र आणि रसायन शास्त्रासहित बारावी पास असावा.

पगार
निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनी पायलटच्या वेतनानुसार ८०,००० रुपये महिना देण्याची तरतूद आहे. 
उड्डान भत्ता वेगळा दिला जाईल.
उमेदवाराला प्रशिक्षणादरम्यान २५,००० रुपये स्टायपेंनच्या रुपात दिला जाईल. 

कसा कराल अर्ज 
इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागेल. अर्जासोबत सामान्य तसंच ओबीसी वर्गाच्या उमेदवारांसाठी १५०० रुपये शुल्क भरावं लागणार आहे. हे शुल्कदेखील ऑनलाईन माध्यमातून भरावं लागेल. 
तर आरक्षित वर्गासाठी मात्र हे अर्ज निशुल्क असतील. 

वयोमर्यादा
जाहिरातीत उल्लेख केल्यानुसार जास्तीत जास्त वयाच्या ३५ वर्षांपर्यंत इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करू शकतील. 
अनुसूचित जाती, जमातीतील उमेदवारांसाठी ४० वर्ष तसंच ओबीसी उमेदवारांसाठी ३८ वर्षांची वयोमर्याद निर्धारित करण्यात आलीय. 

नेत्रदोष असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना सल्ला
इच्छुक उमेदवारांमध्ये नेत्रदोष आढळल्यास ते ही संधी गमावू शकतात. त्यामुळे अगोदरच उपचार करून घ्या, असा सल्लाही दिला गेलाय. 

कधीपर्यंत दाखल कराल अर्ज?
इच्छुक उमेदवारांनी २७ ऑगस्ट २०१५ पर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत. इतर माहितीसाठी www.airindia.in वर लॉग इन करा. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.