साक्षी महाराजांच्या वक्तव्याने युपीत भाजपचं टेन्शन वाढलं

उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय. भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. पण आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या विजयानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे खासदार साक्षी महाराज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Updated: Mar 11, 2017, 01:04 PM IST
साक्षी महाराजांच्या वक्तव्याने युपीत भाजपचं टेन्शन वाढलं title=

लखनऊ : उत्तर प्रदेशात भाजपला स्पष्ट बहुमत मिळतंय. भाजपने त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजून जाहीर केलेला नाही. पण आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे. भाजपच्या विजयानंतर वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असणारे खासदार साक्षी महाराज यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

'भाजपनं उत्तर प्रदेशात दलित किंवा ओबीसी व्यक्तीला मुख्यमंत्री करावं' अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते साक्षी महाराज यांनी दिली आहे. त्यामुळे साक्षी महाराजांच्या या मताचा किती विचार होईल हे पाहावं लागेल. निवडणुकीनंतर भाजपचं संसदीय मंडळ याबाबत निर्णय घेईल असं भाजपकडून सांगण्यात आलं होतं. 

मुख्यमंत्रीपदाचा शर्यतीत आता अनेक नावांची चर्चा आहे. पण यूपीमधलं जातीच्या मुद्दा घेत साक्षी महाराजांनी दलित-ओबीसी कार्ड खेळलं आहे. यूपीमध्ये २० ते २२ टक्के दलित तर २७ टक्के मागासवर्गीय समाज आहे. 

देशासह उत्तर प्रदेशात भाजपची उच्चवर्णीयांचा पक्ष अशी ओळख आहे. त्यामुळे ब्राम्हण मुख्यमंत्री होतो का असं सगळ्यांना वाटत होतं पण साक्षी महाराजांनी हे वक्तव्य करत भाजपच्या संसदीय मंडळासमोरचं टेन्शन आणखी वाढवलं आहे.