मोदींच्या उपस्थित सत्यपालसिंह आज `खाकी`तून `खादी`त

मेरठमध्ये आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेतील प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आज मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

Updated: Feb 2, 2014, 03:49 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मेरठ
मेरठमध्ये आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची शंखनाद रॅली होत आहे. या सभेतील प्रमुख आकर्षण म्हणजे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह आज मोदींच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सत्यपाल सिंह यांनी खाकी सोडून खादीची कास धरण्याचं यापूर्वीचं जाहीर केलं होतं. आपल्याला रस्त्यावर उतरून समाजसेवा करायची असल्याने आपण राजकारणात उतरत असल्याचं सत्यपाल सिंह यांनी यापूर्वीच जाहीर केलं होतं.
सत्यपालसिंह भाजपकडून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा आहे. भाजप त्यांना कोणत्या मतदारसंघातून तिकीट देणार आहे, हे अजून निश्चित झालेलं नाही.
नरेंद्र मोदी यांच्यासभेला आज मेरठमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं चित्र आहे. डॉ.सत्यपाल सिंहही खादीच्या वेशात आज स्टेजवर दिसून आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.