काळापैसा साठवणाऱ्या ९०० कंपन्यांना सेबीचा दणका

काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूकीचा आधार घेऊ पाहणाऱ्या ९०० कंपन्यांवर सेबीनं बंदी घातलीय. याविषयीची माहिती सेबीचे प्रमुख यू. के. सिन्हा यांनी पीटीआयला दिलीय.

Updated: Jul 23, 2015, 09:23 AM IST
काळापैसा साठवणाऱ्या ९०० कंपन्यांना सेबीचा दणका title=

नवी दिल्ली: काळा पैसा पांढरा करण्यासाठी शेअर बाजारातल्या गुंतवणूकीचा आधार घेऊ पाहणाऱ्या ९०० कंपन्यांवर सेबीनं बंदी घातलीय. याविषयीची माहिती सेबीचे प्रमुख यू. के. सिन्हा यांनी पीटीआयला दिलीय.

या कंपन्यांनी करापोटी ५ ते ६ हजार कोटी रुपये बुडवल्याचा संशयही सेबीनं व्यक्त केलाय. केंद्रीय प्रत्यक्षकर विभागाला या ९०० कंपन्यांची यादी देण्यात आलीय. करचुकवेगिरीप्रकरणी या कंपन्यांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची शिफारसही सेबीनं केलीय. कोणताही देश असो, कायद्यातून पळवाटा शोधून लबाडी करणारे सगळीकडेच असतात. 

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या माणसांमुळं देशाच्या प्रगतीला खीळ बसते आणि अशा कंपन्यांवर कारवाई व्हायलाच हवी अशी भूमिका यू. के. सिन्हा यांनी पीटीआयशी बोलताना व्यक्त केलीय. आयपीओ, डिपॉझिटरी रिसिट्ससच्या माध्यमातून अनेकदा काळापैसा पांढरा करण्याचे प्रयत्न झाल्याचंही सेबीच्या तपासात पुढे आलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.