बेळगाव प्रश्नी शिवसेनेचा लोकसभेत आवाज

सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरु असलेल्या कानडी अत्याचारावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. 

Updated: Jul 30, 2014, 02:42 PM IST
बेळगाव प्रश्नी शिवसेनेचा लोकसभेत आवाज title=

नवी दिल्ली : सीमाभागातल्या मराठी बांधवांवर सुरु असलेल्या कानडी अत्याचारावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. सीमाभाग केंद्रशासित करावा, अशी मागणी शिवसेना खासदारांनी केली. 

कर्नाटक पोलिसांच्या अत्याचाराबाबत शिवसेना खासदारांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा अशी मागणी केली. यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली. या प्रकारानंतर लोकसभेचे कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होतं.

महाराष्ट्र राज्याच्या एसटी बस कर्नाटक सीमेवर पोलिसांनी थांबवल्या. अनेक बसेस उमरगा सीमा तपासणी नाक्यावर अडकून पडल्या. 

येल्ल्युर प्रकरणाच्या पडसादामूळे कर्नाटकातील आंदोलनात महाराष्ट्र एसटी बसना नुकसान पोहचु नये म्हणून खबरदारी घेण्यात येतेय. उमरगा सीमा तपासणी नाक्यावर बसेस पोलिसांनी थांबवल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

दरम्यान, सीमावर्ती भागातील मराठी भाषकांवर अत्याचार करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या प्रतीकात्मक पुतळा मनसेनं जाळला. 

पुण्याच्या अलका टॉकीज चौकात हे आंदोलन करण्यात आलं. त्यांनतर मनसे कार्यकर्त्यांनी बाजीराव रस्त्यावरील कर्नाटक बेंकेच्या बोर्डला काळं फासलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.