हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत

भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत आणण्यात आलंय. इथल्या नेहरु स्टेडियममध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

Updated: Feb 12, 2016, 02:32 PM IST
हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत  title=

धारवाड, हुबळी : भारताचा हिमयोद्धा लान्स नायक हनुमंत्तप्पा कोप्पड यांचं पार्थिव विमानानं हुबळीत आणण्यात आलंय. इथल्या नेहरु स्टेडियममध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

सकाळी पावणेबाराच्या सुमारास हनुमंत्तप्पा यांची मृत्यूशी झुंज संपली.गेल्या नऊ दिवसांमधला हणमंतप्पांचा संघर्ष कमालीचा प्रेरणा देणारा होता. अख्खा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता.... पण अखेर ही झुंज व्यर्थ ठरली. नवी दिल्लीत हणमंत्तप्पा यांना आदरांजली वाहण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली.

लष्करप्रमुख जनरल दलवीरसिंग सुहाग, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे उपस्थित होते. लष्करी इमामात त्यांना मानवंदना देण्यात आली. शहीद जवान हणुमंतप्पा यांच्या पार्थिवावर आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती धारवाडच्या जिल्हाधिका-यांनी दिलीय..