उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू!

देशातील आरोग्य यंत्रणा मृत्यूचा यमदूत बनत चालली आहे. वेळेत औषध उपचार मिळत नाही. तर गरीब रुग्णांना स्ट्रेचर, अॅंब्युलन्स मिळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहेत. याचे सरकारसह आरोग्य यंत्रणेला देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब उघड झालेय. उपचारा अभावी 12 वर्षीय मुलाचा वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाला.

ANI | Updated: Aug 30, 2016, 04:29 PM IST
उपचारा अभावी मुलाचा वडिलांच्या खांद्यावर मृत्यू! title=

कानपूर : देशातील आरोग्य यंत्रणा मृत्यूचा यमदूत बनत चालली आहे. वेळेत औषध उपचार मिळत नाही. तर गरीब रुग्णांना स्ट्रेचर, अॅंब्युलन्स मिळणास अडचणी येत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचे दिसत आहेत. याचे सरकारसह आरोग्य यंत्रणेला देणे-घेणे नसल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक बाब उघड झालेय. उपचारा अभावी 12 वर्षीय मुलाचा वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाला.

वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने मुलाचा उपचारासाठी रुग्णालयात नेणाऱ्या वडिलांच्या खांद्यावरच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कानपूरमधील फझलजंग परिसरातील अंश सुनील कुमार या मुलाला खूप ताप आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ताप काही केल्या उतरत नव्हता.  दोन दिवस खासगी रुग्णालयातील उपचारानंतर वडिलांनी अंशला दुसऱ्या रुग्णालयात हलविले. तेथील डॉक्‍टरांनी अंशला बालकांच्या विभागात नेण्यास सांगितले. त्यामुळे सुनील यांनी अंशला खांद्यावर टाकून बालकांच्या विभागात नेले.

डॉक्‍टरांनी तपासणी केल्यानंतर अंशला मृत घोषित केले. अंश हा सहाव्या वर्गात शिकत होता. तो अभ्यासात हुशार होता. जर त्याला घेऊन मी रुग्णालयाच्या बालक विभागात फक्त दहा मिनिटे लवकर पोचलो असतो तर त्याला वाचवता आले असते, असे डॉक्‍टरांनी सांगितले, अशी माहिती अंशच्या वडिलांनी दिली. 

हॅलेट रुग्णालयाचा हा निष्काळजीपणा आहे. त्यांनी माझ्या मुलावर उपचार केले नाहीत. एवढेच नाही तर त्यांनी साधे स्ट्रेचरही पुरविले नाही. मी माझ्या खांद्यावर मुलाला टाकून इकडून तिकडे फिरत होतो, असे डोळ्यात अश्रु आलेले त्याचे वडील सांगत होते.