पाकिस्तानच्या ISIला माहिती पुरवणारी टोळी अटकेत

जम्मू आणि कोलकातामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला माहिती पुरवणा-या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. 

Updated: Nov 30, 2015, 01:09 PM IST
पाकिस्तानच्या ISIला माहिती पुरवणारी टोळी अटकेत  title=

नवी दिल्ली/कोलकाता : जम्मू आणि कोलकातामध्ये पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ISI ला माहिती पुरवणा-या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. 

विशेष बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या टोळीमधील चार जणांसह बीएसएफच्या एका जवानाचाही समावेश आहे. अब्दुल रशीद असं अटक करण्यात आलेल्या बीएसएफच्या जवानाचं नाव आहे. तो ई-मेल, वॉट्सअप आणि वायबर सारख्या सोशल मीडियाच्या सहाय्यानं शत्रूला माहिती पुरवत होता, असं पोलिसांनी सांगितलंय. 

कोलकातामध्ये अटक कऱण्यात आलेल्या तीनही आरोपींना आज कोर्टात सादर केलं जाणार आहे. कोलकाता येथून पकडण्यात आलेल्या तीन एजंटपैकी दोघेजण बाप-लेक आहेत. तर तिसरा त्यांचाच नातेवाईक आहे. यापूर्वी शुक्रवारीही मेरठ येथून ISIच्या एका एजंटला अटक करण्यात आली होती.

अटक करण्यात आलेल्यांपैकी कफतुल्ला खान हा पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेचा ऑपरेटर आहे आणि बीएसएफ जवान रशीद या त्याचा मुख्य सूत्र होता, अशी माहिती संयुक्त पोलीस आयुक्त रविंद्र यादव यांनी दिलीय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.