अनंत गितेंबाबत अजून कोणताही विचार नाही – राजनाथ सिंह

भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय. गिते यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 

Updated: Sep 28, 2014, 04:16 PM IST
अनंत गितेंबाबत अजून कोणताही विचार नाही – राजनाथ सिंह title=

नवी दिल्ली: भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय. गिते यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 

युती तुटणं दुर्दैवी आहे, मात्र शिवसेना सोबत नसली तरी महाराष्ट्रात भाजपाचीच सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात भाजपाला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्री कोण होणार, याचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळ घेईल, असंही सिंग यांनी स्पष्ट केलंय.

राज्यात युती तुटल्यानंतर केंद्रातल्या युतीचं काय यावरही विचारविनिमय झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेसोबतची युती टिकवण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केला, पण समाधानकारक तोडगा न निघाल्यानं युती तुटल्याचं ते म्हणाले आणि त्याबद्दल दुःखही व्यक्त केलं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.