उत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या

साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय. 

Updated: Feb 1, 2015, 03:36 PM IST
उत्पादन वाढल्यानं साखरेच्या किंमती पडल्या title=

नवी दिल्ली : साखर कारखान्यांच्या उत्तम कार्यक्षमतेमुळे देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध झालाय. त्यामुळेच, गेल्या आठवड्यादरम्यान राजधानी दिल्लीत घाऊक (होलसेल) बाजारात साखरेची किंमत 10 रुपये प्रती क्विंटल कमी झालीय. 

बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाजारात उत्पादन जास्त आणि मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्यानं किंमतीत घट झालीय.

दरम्यान, सरकारनं कच्च्या साखरेवर निर्यात सहाय्यता पुन्हा लागू करण्याच्या बातम्यांनी साखरेच्या किंमतीतील घट स्थिरावलीय. 

तयार साखर एम-30 आणि एस-30 च्या किंमती गेल्या आठवड्यात 2780 ते 3030 रुपये तसंच 2770 ते 2010 रुपयांवरून घसरून 2789 ते 3030 रुपये आणि 2770 ते 3000 रुपये प्रति क्विंटवलवर बंद झालेत. 

साखरेची किंमत 10-10 रुपयांनी घटल्यानंतर असमोली - 2820, सिंभौली - 2840, रामाला - 2750, बागपत - 2760, सकोटी - 2720, मोरना - 2769, चांदपूर, 2720, नजीदाबाद - 2740, मवाना - 2770, धनोरा - 2880, मोदीनगर - 2790, खतौली - 2760, धामपूर - 2740 रुपये प्रति क्विंटल स्थिरावलीय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.