सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे रेप घटनांत वाढ : अतुल कुमार अंजान

सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असे धक्कादायक विधान डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी केलेय.

Updated: Sep 2, 2015, 10:46 PM IST
सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे रेप घटनांत वाढ :  अतुल कुमार अंजान title=

गाजीपूर : सनी लिऑनच्या कंडोम जाहिरातीमुळे बलात्कारांच्या घटनांत वाढ झाली आहे, असे धक्कादायक विधान डाव्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अतुल कुमार अंजान यांनी केलेय.

अधिक वाचा : सनी लिऑनचा 'एक पहेली लीला'चा धुमाकूळ

उत्तर प्रदेशमधील गाजीपूर येथे एका रॅलीला संबोधित करताना हे वादग्रस्त विधान केलेय. त्यांनी तरुणांना आवाहन करताना सांगितले, तुम्ही यापासून सावधान राहा.

कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अतुल कुमार अंजान हे आहेत. सनी लिऑनच्या जाहिरातीमुळे समाजात रेपच्या घटना वाढत आहेत. कंडोमची जाहिरात करणारी अभिनेत्रीने चांगले सिनेमे केलेले नाहीत. तिने अश्लील, डर्टी सिनेमे केलेत. या सिनेमांना पॉर्न फिल्म म्हटले जाते. लोकांनी जरी तिचे दोन मिनिटे सिनेमे पाहीले तर त्यांना उल्टी होती. कंडोमची बिभत्स जाहिरत रेपला प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.