गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार

भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे. 

Updated: Mar 28, 2016, 10:39 AM IST
गृहपाठ न केल्याने शिक्षकाचा विद्यार्थिनीवर केला बलात्कार title=

भोपाळ : मध्य प्रदेश राज्यातील सिंगरौलीत एक संतापजनक घटना घडली आहे. विद्यार्थिनीने गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडलीये.

टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रात आलेल्या बातमीनुसार २३ मार्च रोजी सिंगरौली जिल्ह्यातील कुरसा गावात सत्य नारायण वर्मा या शिक्षकाने दुसरीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला. दिलेला गृहपाठ पूर्ण न केल्याने त्याने आधी तिला शिक्षा केली आणि त्यानंतर तिला शाळेच्या पाठीमागे नेऊन तिच्यावर अत्याचार केले.

जेव्हा ही मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिच्या घरी कोणीही नव्हते. रात्री जेव्हा तिचे पालक घरी परतले तेव्हा त्यांना ही घटना समजली. गावकऱ्यांचा सल्ला घेऊन नंतर तिच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

२५ मार्चला आरोपीला अटक करण्यात आली आणि त्याला सध्या पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांतली मध्य प्रदेशमधील याप्रकारची ही सहावी घटना आहे.