लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप

'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच  सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

Updated: Sep 5, 2015, 06:27 PM IST
लाच मागितली म्हणून तहसील कार्यालयात सोडले साप title=

लखनऊ : 'मुन्ना भाई एमबीबीएस' हा सिनेमा पाहिला की, गांधीगिरी काय असते त्याची प्रचिती येते. या शब्दाला आता सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ झालाय. कारण लाच मागणाऱ्यांना अद्दल घडविण्यासाठी एकाने चक्क तहसील कार्यालयात सापच  सोडले. या प्रकाराने अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यामधल्या लारा गावातील हक्कुल या एका सर्पमित्राने निषेध प्रगट करण्याचा जो एक नवीनच प्रकार केला आहे त्यामुळे सर्पगिरी हा एक नवीन शब्द रूढ होण्यास मदत झालेय.

लारा गावाच्या आजूबाजूला असलेल्या खेड्यापाड्यांत या हक्कुलची, सर्प पकडणारा प्रसिद्ध आहे. पुण्याला कात्रज जवळ एक सर्प उद्यान आहे तसेच, एक उद्यान गावाजवळ बनवायचे आहे. त्यासाठी सरकारने एक प्लॉट आपल्याला द्यावा, अशी त्याची मागणी होती.

(हा व्हिडिओ ३० नोव्हेंबर २०११ असून तो सोशल मीडियावर व्हायरल  होत आहे.)

आपल्या मागणीसाठी तो सरकारी कार्यालयात खेपा मारत  होता. अगदी कनिष्ठ अधिकार्‍यांपासून वरिष्ठ अधिकार्‍यांपर्यंत तो सर्वांना भेटला आहे. त्याने राष्ट्रपतींकडे सुद्धा आपला अर्ज पाठवला होता. हक्कुलला प्लॉट मिळत नव्हता. अधिकारी लाच मागण्याचा प्रयत्न करीत होता. त्यामुळे तो निराश झाला. अजब मार्ग अबलंबिला आणि हरैया या गावातील तहसिलदार कार्यालयात चक्क साप सोडलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.