महिला प्रवाशासमोर हस्तमैथून, उबेर कॅब चालकाला अटक

महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून करणाऱ्या उबेरच्या कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे, गुन्हा दाखल होताच उबेरने देखील या टॅक्सी चालकाला कामावरून काढून टाकलं आहे.

Updated: Jul 22, 2015, 04:05 PM IST
महिला प्रवाशासमोर हस्तमैथून, उबेर कॅब चालकाला अटक title=

कोलकाता : महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून करणाऱ्या उबेरच्या कॅब चालकाला अटक करण्यात आली आहे, गुन्हा दाखल होताच उबेरने देखील या टॅक्सी चालकाला कामावरून काढून टाकलं आहे.

जगभरात ई-कॉमर्सचा दबदबा वाढतोय, अॅपवरून टॅक्सी भाड्याला घेण्याची पद्धत लोकप्रिय होत असतांना, उबेर कॅबच्या टॅक्सी चालकाने महिला प्रवाशांसमोर हस्तमैथून केल्याने, अशा टॅक्सी सेवांच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्हं उपस्थित झालं आहे.

मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून उबेरसारख्या सेवा यासाठी महत्वाच्या देखील आहेत, की ही सेवा घेण्याआधी टॅक्सीचा तपशील तुमच्या मोबाईलवर असतो.

महिला प्रवाशासमोर हस्तमैथून करणाऱ्या टॅक्सी चालकाचं नाव, 'पिंटू यादव' आहे. गुन्हा दाखल होताच उबेरने पिंटूला कामावरुन काढून टाकल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

दिल्लीतील एका महिला प्रवाशासमोर टॅक्सी चालकाने हस्तमैथून केल्याची ताजी आहे, असं असतांना पश्चिम बंगालमधील महिला प्रवाशासोबतही ही घटना घडली आहे. 

कोलकात्यातील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणी काही दिवसांपूर्वी उबेर कॅबमधून प्रवास करत होती. कॅब चालक पिंटू यादवने गाडी निर्जनस्थळी नेत महिला प्रवाशासमोर हस्तमैथून केले. 

महिलेने या प्रकाराला विरोध दर्शवताच त्याने पिडीत महिलेला धमकावले. टॅक्सीतून सुटका झाल्यावर पिडीत महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 

पोलिसांनी पिंटू यादवला २० जुलैरोजी अटक केली आहे. पिंटू यादवला कामावरुन काढून टाकले आहे. उबेरने दिलेल्या प्रतिसादावर पिडीत महिलेनेही समाधान व्यक्त केले आहे अशी माहिती उबेरच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिली. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.