महाराष्ट्रात जे केले तेच केलं भाजपने युपीत

 उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे. 

Updated: Aug 11, 2016, 03:32 PM IST
महाराष्ट्रात जे केले तेच केलं  भाजपने युपीत title=

लखनऊ :  उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकांचे काउंट डाऊन सुरू झाले आहे. आता भाजपने महाराष्ट्रात जी रणनिती अवलंबली तशी रणनिती उत्तरप्रदेशात अवलंबत आहे. 

आता निवडणुकीपूर्वी अनेक विद्यमान आमदारांना आपल्याकडे खचण्याचे प्रकार भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सुरू केले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जे आमदार हमखास निवडून येतील अशांनाच भाजप आपल्या पक्षात प्रवेश देतांना दिसत आहे. 

काल झालेल्या पक्षबदलात बहुजन समाज पक्षाचे चार आमदार भाजपमध्ये दाखल झाले. तर इतर सात आमदारांनी भाजपची वाट धरली आहे. त्यामुळे भाजप प्रदेश कार्यालयात खूप गर्दीचं वातावरण होतं. 

भाजपने आज सत्तारूढ समाजवादी पक्षासह २७ वर्षांपासून सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या काँग्रेसलाही झटका दिला. 

समाजवादी पक्षाचे एक आमदार, काँग्रेसचे तीन आणि बसपच्या दोन आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.