छेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल

दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं. 

Updated: Aug 24, 2015, 05:30 PM IST
छेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल title=

नवी दिल्ली: दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं. 

तरुणीनं आपल्या मोबाईलमध्ये आरोपीचा फोटोही काढला होता. मात्र पोलिसांनी ते नाकारलं. मग तरुणीनं फेसबुकवर आरोपीचा फोटो टाकून न्यायाची अपेक्षा केलीय.

दिल्लीत टिळकनगर भागातील अग्रवाल चौकात काल रात्री साडे आठच्या सुमारास दिल्ली विद्यापीठात शिकाणाऱ्या तरुणीसोबत छेडछाड झाली. तरुणीनं आरोपीचा फोटो मोबाईलमध्ये काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं. दिल्ली पोलिसांच्या पीसीआर व्हॅननं जुजबी माहिती घेत तरुणीला सकाळी येण्यास सांगितलं. पोलिसांनी जर मनात आणलं असतं तर फोटोच्या आधारे भामट्याचा शोध घेता आला असता. 

पाहा व्हिडिओ- 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.