निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंग, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंगवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. त्यामुळे आता मतदारांना उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी EVM मशिनमध्ये `रिजेक्ट`चं बटण द्यावे, असं सर्वोच्च न्यायालयने हा निर्णय देताना म्हटलं आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 27, 2013, 12:22 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
निवडणुकीत निगेटीव्ह व्होटिंगवर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिलाय. त्यामुळे आता मतदारांना उमेदवार नाकारण्याचा अधिकार मिळणार आहे. त्यासाठी EVM मशिनमध्ये `रिजेक्ट`चं बटण द्यावे, असं सर्वोच्च न्यायालयने हा निर्णय देताना म्हटलं आहे.
मतदाराला राईट टू रिजेक्टचा अधिकार मिळणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना नाकारण्याचा मतदारांना अधिकार आहे. मतदान यंत्रातील उपलब्ध पर्यांयांपैकी कोणालाही मत न देता नकारात्मक मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत.
नकारात्मक मतदानामुळे मतदान पद्धतीमध्ये परिवर्तन होईल. राजकीय पक्षांना स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देणे भाग पडेल, असे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. संसदेतील मतदानाच्या वेळी जर एखाद्या खासदाराला तटस्थ राहण्याचा अधिकार असेल, तर तो अधिकार मतदारांनाही असायला हवा, असेही न्यायालयाने हा निर्णय देताना म्हटले आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.