अयोध्येत महाशौचालय बनवणार का - जयराम रमेश

देवालयापेक्षा जास्त महत्त्व सध्या शौचालयांना दिलं जावं, या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

Updated: Oct 3, 2013, 06:47 PM IST

देवालयापेक्षा जास्त महत्त्व सध्या शौचालयांना दिलं जावं, या भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी चांगलाच समाचार घेतलाय.
रमेश यांनी म्हटलंय की, “मोदी रोजच आपलं रूप बदलतात. अयोध्येमध्ये महाशौचालय बनवण्याच्या कांशीराम यांच्या सूचनेशी मोदी आता सहमत आहेत का हे त्यांना विचारायला पाहिजे.”
केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी आधीच मंदिरांपेक्षा शौचालयांच्या निर्मीतीवर लक्ष देण्याची गरज आहे, असे म्हटले होते. त्यावेळी भाजपने बराच गहजब केला होता.
एका कार्यक्रमाच्यावेळी पत्रकारासोबत बोलतांना जयराम रमेश यांनी म्हटंल की, “स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे मोदी आज नव्या अवतारात समोर आले आहेत. ते एक बहुरूपी नेता आहेत, जे रोज नव्या अवतारात येतात.” जयराम रमेश पुढं बोलले की. `भारतात दशावताराबद्दल सर्वांना माहिती आहे, मात्र मोदींसाठी हा शब्द कमी आहे. ते शतावतारी नेता आहेत’

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.