भारत-पाकिस्तानमध्ये नोव्हेंबर महिन्यात युद्ध

ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार 17 सप्टेंबर 2016 ते 16 नोव्हेंबर 2016 हा भारत-पाकिस्तान दरम्यानचा कठीण काळ आहे, यात युद्धासारखी परिस्थिती तयार होऊ शकते. यावरून भारत-पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल असं भाकीत आहे.

Updated: Oct 6, 2016, 06:12 PM IST
भारत-पाकिस्तानमध्ये नोव्हेंबर महिन्यात युद्ध title=

जयपूर : ज्योतिषांनी केलेल्या भाकितानुसार 17 सप्टेंबर 2016 ते 16 नोव्हेंबर 2016 हा भारत-पाकिस्तान दरम्यानचा कठीण काळ आहे, यात युद्धासारखी परिस्थिती तयार होऊ शकते. यावरून भारत-पाकिस्तानात नोव्हेंबरमध्ये युद्ध होईल असं भाकीत आहे.

भारताची कुंडली भारत स्वतंत्र झाला त्या दिवसाच्या आधारावर बनवण्यात आली आहे. ज्यात वृषभ लग्न आणि कर्क राशीने कुंडली तयार होते.

यावेळी चंद्र पुष्य नक्षत्रात होता, यात शनी स्वामी होता. भारताचं स्वातंत्र्य शनीची महादशा सुरू असताना मिळालं. भारताच्या कुंडलीत मंगळ कायम आहे. 

मंगळाचं धनू आणि राहूचं लग्न हे मंगळ आणि राहूमध्ये षडाष्टक योग होण्यासारखं आहे. या योगाचे हिंसक परिणाम पाहण्यास मिळतील असं भविष्यकार सांगतात.