सुनंदा मृत्यू प्रकरण : FIR बाबत काँग्रेसचं आश्चर्य

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस भाजपमध्ये आरोप - प्रत्त्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. मृत्यूनंतर एका वर्षानं पोलिसांनी F I R दाखल केल्याबद्दल, काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय.

Updated: Jan 6, 2015, 07:07 PM IST
सुनंदा मृत्यू प्रकरण : FIR बाबत काँग्रेसचं आश्चर्य title=

नवी दिल्ली : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणावरुन काँग्रेस भाजपमध्ये आरोप - प्रत्त्यारोपाचं राजकारण सुरु झालंय. मृत्यूनंतर एका वर्षानं पोलिसांनी F I R दाखल केल्याबद्दल, काँग्रेसनं आश्चर्य व्यक्त केलंय.

सुडाचं राजकारण करु नये, असं आवाहन काँग्रेसनं केले आहे. तर पोलिसांचा तपास सुरु असून तो योग्य दिशेनं सुरु असल्याचं, भाजपनं म्हटले आहे.

माजी केंद्रीयमंत्री शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी दिल्ली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय. मात्र अज्ञात व्यक्तीविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्कर यांची विषाचे इंजेक्शन देऊन हत्या करण्यात आल्याची माहिती दिल्लीचे पोलीस आयुक्त बी एस बस्सी यांनी दिलीय. मात्र हे इंजेक्शन कुणी आणि का दिलं याचा तपास आता दिल्ली पोलीस करत असल्याची माहिती बस्सी यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.