जगणे महागले!

By Jaywant Patil | Last Updated: Thursday, September 13, 2012 - 21:35

www.24taas.com, नवी दिल्ली
डिझेल पाच रुपयांनी महागलंय. आज मध्यरात्रीपासून या नव्या दराने डिझेल विकत घ्यावे लागेल. पेट्रोल आणि एलपीजीच्या दरात सध्या वाढ झालेली नाही. पण आता वर्षभरात एका ग्राहकाला सबसिडी असलेले फक्त सहा सिलिंडर मिळणार आहेत. त्यानंतर सातव्या सिलिंडरची गरज लागली, तर तो बाजारभावानुसार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत सातशेच्या वर जाणार आहे. यावर वॅट कर वेगळा आकारला जाणार आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरची किंमत साडे सातशे ते आठशे पर्यंत जाणार आहे.
सध्या सिलेंडरवर ३२० रुपयांची सबसिडी आहे. आता वरषाला बारा सिलेंडर वापरले, तर तुम्हाला १६००० रुपये खर्च येणार आहे. मुंबईत आता सातव्या सिलेंडरला ७५०+ व्हॅट इतकी किंमत असेल.
मात्र पेट्रोलवरील एक्साइज ड्युटी साडे पाच रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे पेट्रोल मात्र स्वस्त होण्याची शक्यता आहे.
पेट्रोलियम कंपन्यांना प्रतिलिटर डिझेलमागे सध्या १९.२६ रुपयांचे नुकसान होत असल्याचं कारण पुढे करत डिझेलची दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ नाइलाजास्तव करण्यात आल्याचं काँग्रेस सरकारचं म्हणणं आहे. तृणमूल काँग्रेसने या भाववाढीचा विरोध केला आहे.

First Published: Thursday, September 13, 2012 - 20:35
comments powered by Disqus