चीनची लुडबूड नको - भारत

अरुणाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यावर चीनने आक्षेप नोंदवला. अरूणाचल प्रदेश भारताचे अविभाज्यअंग असताना चीन संरक्षण मंत्राच्या दौऱ्याला आक्षेप कसा घेऊ शकतो. याचे भारताने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. हा आक्षेप नोंदविताना चीनने भारताच्याबाबतीत लुडबूड चालणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.

Updated: Feb 28, 2012, 08:36 AM IST

www.24taas.com, बंगळूर

 

 

अरुणाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर गेलेल्या संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांच्यावर चीनने आक्षेप नोंदवला. अरूणाचल प्रदेश भारताचे अविभाज्यअंग असताना चीन संरक्षण मंत्राच्या दौऱ्याला आक्षेप कसा घेऊ शकतो. याचे भारताने आश्‍चर्य व्यक्त केले आहे. हा आक्षेप नोंदविताना चीनची भारताच्याबाबतीत लुडबूड चालणार नाही, असे भारताने ठणकावून सांगितले आहे.

 

 

गेल्या आठवड्यात संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी केलेल्या अरुणाचल प्रदेशाच्या दौऱ्याला चीनने घेतलेल्या आक्षेप घेतला. याबाब  भारताचे विदेशमंत्री एस. एम. कृष्णा यांनी चीनची लुडबूड खपवून घेतली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. भारताने चीनचे हे वर्तन गांभीर्याने घेतले  आहे. भारताच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये लुडबूड करण्याचा चीनला काहीही अधिकार नाही. ही लुडबूड अजिबात खपवून घेतली जाणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे, हे चीनने विसरता कामा नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

 

दरम्यान, सीमावर्ती भागात शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्यासाठी भारताने चीनला सहकार्याने करायला हवे, असे  चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते हांग ली यांनी आपला आक्षेप नोंदविताना म्हटले होते.  20 फेब्रुवारी २०१२ रोजी अँटनी अरुणाचल प्रदेशात एका समारंभासाठी उपस्थित राहिले होते. त्यावर चीनच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते हांग ली यांनी आक्षेप नोंदवला होता.