पॅरीस : फ्रान्समध्ये एका डोंगरावर गवत खात असलेली ५०० किलोची गाय उंचावरून रस्त्यावर चालणाऱ्या एका कारवर पडली, या अपघातात ड्रायव्हर थोडक्यात बचावला, गाय कारच्या बोनेटवर पडली.
कारमधील व्यक्ती आपल्या सावत्र मुलासोबत स्पेनच्या सीमेवर पिरनीजच्या डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेले होते.
या दरम्यान एक गाय त्यांच्या कारवर येऊन पडली. या झटक्याने त्यांची कार थांबली गाईचे शिंग विंडस्क्रिनमध्ये घुसले आणि काच चकनाचूर झाली. जोरात झालेल्या आवाजामुळे स्थानिक घटनास्थळी पोहचले. त्यांनी सांगितले की, गाय उंचावर चरत होती. तिचे संतुलन बिघडले आणि ती डोंगरावरून खाली आली.
या अपघातात गायीचा मृत्यू झाला. कारचे मोठे नुकसान झाले. पण पिता-पुत्र थोडक्यात बचावले. ते जखमी झाले नाही पण खूप घाबरले होते. गायीच्या मृत्यूमुळे दुखी झालेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.