`चीन`ची आता विंडोज - 8 वर बंदी

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीचे विंडोज - 8 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चीनने बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजच्या मालकीचे विंडोज एक्सपी वर्जन गेल्याचं महिन्यात बंद केल्याने चिन सरकारने विंडोज - 8 बंद केले आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त सरकारी कार्यालयांमध्येच करण्यात आली आहे.

Updated: May 21, 2014, 07:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, बीजिंग

मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या मालकीचे विंडोज - 8 या ऑपरेटिंग सिस्टिमवर चीनने बंदी घातली आहे. मायक्रोसॉफ्ट कंपनीने विंडोजच्या मालकीचे विंडोज एक्सपी वर्जन गेल्याचं महिन्यात बंद केल्याने चिन सरकारने विंडोज - 8 बंद केले आहे. विशेष म्हणजे ही बंदी फक्त सरकारी कार्यालयांमध्येच करण्यात आली आहे.
पण यामागे एक वेगळेच कारण असल्याचे बोलले जात आहे, `अमेरिकेने सायबर हेरगिरी प्रकरणात चीनच्या सहा लष्करी अधिकार्‍यांवर कारवाई केली आहे. या सहा लष्करी अधिकाऱ्यांवर संगणकांमधून चोरी केल्याचा हा ठपका अमेरिकेने ठेवला आहे. याच कारणाने दुसऱ्या दिवशी चीनने विंडोज 8 बंद करण्याचा आदेश दिला.`
राष्ट्रीय कॉपीराइट प्रशासनाचा दावा आहे की, विंडोज एक्सपीचा सपोर्ट बंद केल्यामुळे सायबर सुरक्षेचा प्रश्न उभा राहू शकतो आणि हॅकर्स याचा फायदा चांगलाच उठवू शकतात.
चिनने सध्या सरकारी वापरासाठी विंडोज -8 ही ऑपरेटिंग सिस्टिम विकत घेऊ नका असा निर्देश केंद्रीय खरेदी केंद्राने दिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.