मलालाच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाक शाळेत बंदी

By Surendra Gangan | Last Updated: Tuesday, November 12, 2013 - 12:40

www.24taas.com, झी मीडिया, इस्लामाबाद
संयुक्त राष्ट्रसंघाने गौरविलेल्या आणि तालिबानी विचारांविरोधात आवाज उठविलेल्या पाकिस्तानी मलाला युसुफजाई हिच्या ‘आय एम मलाला’ पुस्तकावर पाकिस्तान शाळेत बंदी घालण्यात आली आहे.
पाकिस्तानात स्त्री शिक्षणाच्या प्रचारासाठी तालिबान्यांशी मलाला युसुफजाई हिने लढा दिला आहे. तिच्या पुस्तकावर तिच्याच पाकिस्तानातील खासगी शाळांनी बंदी घातली आहे. हे पुस्तक इस्लाम विरोधी असून यात इस्लामचा अपमान करण्यात आल्याचा आरोप पाकिस्तानच्या खासगी शाळा संघटनांनी केला आहे.
मलालाचे ‘आय एम मलाला’ हे पुस्तक ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झाले होते. मात्र पाकिस्तानातून या पुस्तकावर टीका करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानी खासगी शाळा संघटनांनी देशभरातील चाळीस हजार शाळांत मलालाच्या पुस्तकावर बंदी घातली आहे.
मलाला ही पाकिस्तानातील विद्यार्थ्यांची आदर्श होती. मात्र या पुस्तकामुळे मलाला ही आता पाश्मिात्य देशाच्या हातातील खेळणं असल्यासारखी आम्हाला वाटू लागली आहे, असे पाकिस्तान खासगी शाळा संघटनेचे अध्यक्ष काशिफ मिश्रा यांनी म्हटले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, November 12, 2013 - 12:40
comments powered by Disqus