न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्ध होण्याची भीती न्यूयॉर्क टाईम्सने व्यक्त केली आहे. लेखात न्यूयॉर्क टाइम्सने म्हटलं आहे की, भारत पाकिस्तानपेक्षा निश्चितच प्रगतीपथावर आहे, म्हणून भारताला याचा सर्वात जास्त फटका बसेल, असं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अग्रलेखात आज म्हटलं आहे.
भारत पाकिस्तानपेक्षा फारच प्रगत देश आहे, त्यामुळे भारताला याचं नुकसान होऊ शकतं, असा अजब तर्क या लेखात आहे.
अण्वस्त्रधारी दोन देशांमध्ये काश्मीर हा एका धोकादायक मुद्दा झाला आहे. कारण दोन्ही देशांच्या नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरूच असतो. हा गोळीबार म्हणजे दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडला जाण्याचा संकेत आहे, असं न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अग्रलेखात म्हटलं आहे.
न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या लेखात पुढे म्हटलं आहे, पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान भारतात मागील आठवड्य़ात गोळीबार झाला, यात मोर्टारचाही उपयोग झाला. यावरून दोन्ही देशांकडून एकमेकांवर आरोप होत आहेत. तज्ञांच्या मते पाकिस्तान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धैर्याची परीक्षा घेत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.