परदेशात महिलेची 'भारतात परत जा' म्हणत वर्णभेदी टीका

Last Updated: Thursday, April 20, 2017 - 12:10
परदेशात महिलेची 'भारतात परत जा' म्हणत वर्णभेदी टीका

नवी दिल्ली : आयरलँडमध्ये एका ट्रेनमध्ये आशियाच्या प्रवाशांवर वर्णभेदावरुन टीका करण्यात आली आहे. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये महिला एका रिकाम्या सीटवर बॅग ठेवण्यासाठी सांगत आहे आणि ती महिला त्यांना सांगत आहे की तुम्ही भारतात परत जा.

ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये महिलेला सोबतच्या प्रवाशांसोबत आक्रमक टीका करतांना दिसत आहे. मीडिया रिपोर्टसनुसार ही घटना रविवारची आहे. जेव्हा ट्रेन लिमरिक कोलबर्ट स्टेशनवरुन लिमरिक जंक्शनला जात होती.

व्हिडिओमध्ये महिला १० मिनिटापर्यंत अयोग्य टीका करत आहे. ती त्या प्रवाशाला सांगत आहे की तुम्ही भारतात परत जा आणि मला ती जागा द्या.

First Published: Thursday, April 20, 2017 - 12:10
comments powered by Disqus