पाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज

पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.

PTI | Updated: Aug 22, 2015, 02:36 PM IST
पाकिस्तानच्या उलड्या बोंबा, कोणत्याही अटी शिवाय चर्चा करु : अझीज title=

लाहोर : पाकिस्तान भारताशी सुरक्षा सल्लागार स्तरावर बोलणी करण्यास तयार आहे. मात्र, आम्हाला कोणत्याही अटी मान्य नाहीत. अटींशिवाय चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, परंतु भारताला चर्चा करायची नाही, असा उलटा आरोप पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी पत्रकार परिषदेत केला.

हुर्रियत नेत्यांशी चर्चा न करण्याच्या अटीवर भारत ठाम आहे. ऊफा येथे झालेल्या चर्चेदरम्यान ठरलेल्या अजेंड्यावर पाकिस्तान ठाम आहे. पाकिस्तानवर आरोप लावणे चुकीचे आहे. भारताविरोधातील पुरावे आमच्याकडे आहेत. भारताने यापूर्वी गेल्या वर्षी होणारी चर्चा रद्द केली होती. यावेळी परत चर्चा रद्द झाल्यास ते दुर्दैवी ठरेल, असे अझीज म्हणालेत.  

अधिक वाचा  : हुर्रियत नेता शब्बीर शाह दिल्लीत नजरकैदेत 

हुर्रियत नेत्यांना अटक करण्यात आल्याच्या वृत्तामुळे आम्ही खूप निराश झालो. त्यांना अटक करणे ही त्यांच्या मूलभूत अधिकारावर गदा आहे. आम्ही अद्याप अधिकृतरित्या एनएसएची बैठक रद्द केलेली नाही. संध्याकाळी भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांची पत्रकार परिषद होणार आहे. त्यातून काय निर्णय होतोय, त्याकडे लक्ष आहे, असे ते पत्रकार परिषदेत म्हणालेत.  
 
काश्मीरचा मुद्दा पाकिस्तान-भारत चर्चेदरम्यान नेहमीच महत्वपूर्ण ठरला आहे. दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काश्मीर प्रश्नावर चर्चा व्हावी, हीच पाकिस्तानची मागणी आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या अटी-शर्तींनुसार पाकिस्तानशी संबंध सुधारायचे आहेत, असे अझीज यांनी यावेळी म्हटले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.