व्हिडिओ: हा आहे जगातील सर्वात डेंजर सेल्फी!

Last Updated: Wednesday, August 27, 2014 - 13:16
व्हिडिओ: हा आहे जगातील सर्वात डेंजर सेल्फी!

मुंबई:  हा आहे जगातील सर्वात डेंजर सेल्फी. फोटो हाँगकाँगचे आहेत. इथल्या सर्वात उंच इमारतींमधील एक इमारत द सेंट्रल स्कायस्क्रेपरच्या छतावर तीन मित्रांनी ही सेल्फी काढली. 

ज्या इमारतीवर चढून सेल्फी काढली ज्याची उंची 1135 फूट आहे. मागील गुरूवारी ही सेल्फी काढली गेली. यात व्हिडिओही तुम्ही पाहू शकता. यात हाँगकाँगची सर्वात उंच इमारत सेंट्रल स्कायस्क्रेपरवर बसून तीन मित्र मजेत केळी खात आहेत आणि सेल्फीचा व्हिडिओ बनवतायेत. 

तीन मित्रांमधील एक डेनियलनं हा व्हिडिओ अपलोड केलाय. ज्यानंतर व्हिडिओ इंटरनेटवर वायरल झाला. आतापर्यंत व्हिडिओला 8 लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय. पण अशाप्रकारे सेल्फी काढणं हे धोकादायक आहे आणि असा प्रयत्न कुणी करू नये, ही झी मीडियाची विनंती आहे. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

First Published: Wednesday, August 27, 2014 - 13:16
comments powered by Disqus