दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशीनमध्ये बंद केलं

स्कॉटलंडच्या रेनफ्रिशर भागात एका महिलेनं आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशिनमध्ये बंद केलं. त्याचा फोटो काढून तिनं हा फोटो फेसबुकवर शेअर केला. 

Updated: Jul 24, 2015, 01:33 PM IST
दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशीनमध्ये बंद केलं title=

डिनबर्ग : स्कॉटलंडच्या रेनफ्रिशर भागात एका महिलेनं आपल्याच दोन वर्षांच्या मुलाला वॉशिंग मशिनमध्ये बंद केलं. त्याचा फोटो काढून तिनं हा फोटो फेसबुकवर शेअर केला. 

त्यानंतर काही काळातच हा फोटो व्हायरल झालाय. या महिलेवर अनेकांनी टीका केलीय. 

'इंडिपेन्डेंट'च्या बातमीनुसार, कर्टनी स्टीव्हर्ट नावाच्या महिलेनं गुरुवारी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आपल्या डाऊन सिंड्रोमनं पीडित मुलाचे फोटो शेअर केले होते. काही वेळातच हे फोटो व्हायरल झाले. 

टीका झाल्यानंतर स्टीवर्टनं फेसबुकवर लिहिलं 'पोलिसांना फोन करून कुणी सांगितलं की मुलावर अत्याचार होतोय. माझ्या मुलाला वॉशिंग मशीनमध्ये घुसून बसणं आवडतं आणि तो हे एन्जॉयही करतो. आणि तो जेव्हा मशीनमध्ये होता तेव्हा ती मशीन विजेशी जोडलेली नव्हती. मी त्याची काळजी घेत होते' 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.