नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात पाऊल, शरीफ यांची घेतली गळाभेट

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले। यावेळी त्यांनी लाहोर विमानतळावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली. नंतर दोघांची गळाभेट झाली.

PTI | Updated: Dec 25, 2015, 05:51 PM IST
नरेंद्र मोदींचे पाकिस्तानात पाऊल, शरीफ यांची घेतली गळाभेट title=

लाहोर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या भूमीवर पाऊल ठेवले। यावेळी त्यांनी लाहोर विमानतळावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली. नंतर दोघांची गळाभेट झाली.

नवाज शरीफ यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी मोदींनी त्यांची भेट घेतली. मोदींचे स्वागत करण्यासाठी नवाज शरीफ जातीने लाहोर विमानतळावर उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तानहून परतीच्या दौऱ्यात अचानक बदल करून लाहोर विमानतळावर नवाझ शरीफ यांची भेट घेतली. विमानतळावर मोदी आणि शरीफ यांची गळाभेट झाली आणि त्यानंतर मोदी हे हॅलिकॉप्टरने शरीफ यांच्या निवासस्थाकडे रवाना झाले आहेत. 

दरम्यान, मोदींच्या पाक भेटीबाबत तर्कवितर्कांना उधाण आले असून युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदींच्या पाकिस्तान भेटीबाबत नाराजी व्यक्त करत दिल्लीमध्ये निदर्शने केली. 

पाकिस्तानात उतरून पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट घेणार असल्याची माहिती खुद्द पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर दिली होती. सुरक्षेच्या कारणास्तव लाहोर विमानतळावर सर्व विमानांचे लॅण्डींग थांबविण्यात आले होते. मोदींच्या या अचानक पाकिस्तान भेटीचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी शेजारी देशांशी चांगले संबंध ठेवावेच लागतात, असे सांगून मोदींच्या निर्णयाचे समर्थन केलेय.

नवाज शरीफ यांच्याशी भेटीबाबत फोनवर बोलणे झाले असल्याचीही माहिती मोदींनी ट्विटद्वारे दिली. दरम्यान, पंतप्रधान विराजमान झाल्यानंतर मोदी या निमित्ताने पहिल्यांदाच पाकिस्तानला भेट दिली.