HIGH ALERT : भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचा 'आयएसआय'चा कट

पाकची गुप्तचर संघटना 'आयएसआय' दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा धक्कादायक खुलासा 'रॉ'नं केलाय.

Updated: Sep 22, 2015, 11:55 AM IST
HIGH ALERT : भारतात दहशतवादी हल्ले घडवण्याचा 'आयएसआय'चा कट  title=

नवी दिल्ली : पाकची गुप्तचर संघटना 'आयएसआय' दहशतवादी संघटनांसोबत मिळून भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचा धक्कादायक खुलासा 'रॉ'नं केलाय.

भारतीय गुप्तचर संघटना 'रॉ'नं याबद्दल भारतीय सुरक्षा यंत्रणेला सूचना दिलीय. पाकिस्तानातली दहशतवादी संघटना 'जैश-ए-मोहम्मद'सोबत मिळून भारताच्या जम्मू-काश्मीर तसंच इतर भागांतही दहशतवादी हल्ले घडवून घातपात करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे, अशी माहिती रॉनं दिलीय. 

अधिक वाचा - पाकिस्तानात पेशावर येथे दहशतवादी हल्ला

यासाठी, 'जैश ए मोहम्मद' या संघटनेला खतपाणी घालण्याचं कामही आयएसआय करत आहे. यापूर्वी, पाकिस्तानात दहशतवादी कारवाया केल्याबद्दल जैश ए मोहम्मदचंही नाव समोर आलं होतं. 

भारतात 2001 साली झालेल्या संसद हल्ल्यामध्येही 'जैश ए मोहम्मद'चा हात असल्याचं उघड झालं होतं. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.