पाकिस्तानच्या २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई

पाकिस्तानच्या तब्बल २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. 

Updated: Oct 17, 2014, 08:36 AM IST
पाकिस्तानच्या २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई title=

लाहोर : पाकिस्तानच्या तब्बल २१० खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. 

पाकिस्तान संविधानाप्रमाणे प्रत्येक खासदाराला प्रत्येक वर्षी ३० सप्टेंबरपर्यंत आपल्या संपत्तीची माहिती संसदेला द्यावी लागते. पण, संसदेच्या २०० हून अधिक सदस्यांनी अजूनही आपल्या संपत्तीची माहिती दिलेली नाही. त्यामुळे त्यांची सदस्यता तात्पुरत्या स्वरुपात निलंबित करण्यात आलीय. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ‘पाकिस्तान निवडणूक आयोग’ (ईसीपी) या खासदारांना आणखी १५ दिवसांची मुदतवाढ देऊ शकतं. 

ईसीपीनं संपत्तीची माहिती देण्यासाठी १५ ऑक्टोबर ही शेवटची तारीख असल्याचं जाहीर केलं होतं. परंतु, अद्यापर्यंत २१० खासदारांनी आपली संपत्ती आणि आपल्याकडे असलेल्या दायित्वाची (लोन्स) माहिती जमा केलेली नाही. 

दिलेली वेळ संपल्यानंतर जाहीर केलेल्या अधिसूचनेत ईसीपीनं खासदारांच्या निलंबनाचे आदेश दिलेत... आदेशांचं पालन न केलेल्यानं सदस्य आपल्या आपल्या विधानसभांच्या सत्रात निलंबनाच्या कालावधीत सहभागी होऊ शकणार नाहीत.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.