VIDEO : ओबामा 'वाईल्ड' सफरीवर... नदीकिनारी भाजून खाल्ला 'सालमन'!

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका वेगळ्याच मिशनवर दिसले. 

Updated: Dec 18, 2015, 07:04 PM IST
VIDEO : ओबामा 'वाईल्ड' सफरीवर... नदीकिनारी भाजून खाल्ला 'सालमन'! title=

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा नुकतेच एका वेगळ्याच मिशनवर दिसले. 

डिस्कव्हरी चॅनेलवर प्रसारित होणाऱ्या 'मॅन वर्सेस वाईल्ड' या कार्यक्रमात ते या कार्यक्रमाचा संचालक बीअर ग्रिल्ससोबत लवकरच दिसणार आहेत. 

या भागाच्या शुटींगदरम्यान ओबामांनी बिअरसोबत अलास्कामध्ये नदीकिनारी बसून... दुर्मिळ अशा भाजलेल्या 'सालमन' माशाचा आस्वादही घेतलेला दिसतोय. 

हा भाग भारतात ३१ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात बराक ओबामा एका वेगळ्याच रुपात पाहायला मिळतील.