स्मार्टफोनमुळे हरवतेय तुमच्या नात्यांतील ऊब!

एका नवीन शोधानुसार, अर्ध्या रात्रीपर्यंत स्मार्टफोनचा वारंवार वापर करणाऱ्या लोकांमध्ये नात्यांतील ऊब कमी होताना दिसतेय. यामुळेच अनेक ब्रेकअप, एकमेकांचा विश्वासघात आणि घटस्फोटांना संधी मिळत असल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय.

Updated: Nov 4, 2014, 08:41 PM IST
स्मार्टफोनमुळे हरवतेय तुमच्या नात्यांतील ऊब! title=

लंडन : एका नवीन शोधानुसार, अर्ध्या रात्रीपर्यंत स्मार्टफोनचा वारंवार वापर करणाऱ्या लोकांमध्ये नात्यांतील ऊब कमी होताना दिसतेय. यामुळेच अनेक ब्रेकअप, एकमेकांचा विश्वासघात आणि घटस्फोटांना संधी मिळत असल्याचं धक्कादायक सत्य उघड झालंय.

या शोधानुसार, शारीरिक संसर्गाची ओढ कमी झाल्यानं लोकांची आशाही कमीच असते... त्यामुळे, खराखुरा रोमान्स म्हणजे काय हेही ते विसरून जातात.
या अभ्यासात ब्रिटेनच्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शोधकर्त्यांनी 24,000 विवाहीत जोडप्यांची माहिती घेऊन त्यावर शोध केला. 

शोधकर्त्यांना सोशल नेटवर्किंग साईट आणि वैवाहिक जीवनाच्या संतुष्टीमध्ये एक नकारार्थी धागा सापडला. 

‘जी जोडपी सोशल मीडियावर इतरांच्या मजेशीर आयुष्याबद्दल जितकं वाचत आणि पाहत राहतील तितकाच त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील निराशा आणि उपेक्षेची नजर वाढतज जाण्याची संभावणा जास्त आहे’. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.