मोदींच्या मेणाच्या पुतळ्यावरून सोशल मीडियात हास्यरंग!

जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचं संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मेणाचा पुतळा दिसणार आहे. 

Updated: Apr 21, 2016, 01:59 PM IST
मोदींच्या मेणाच्या पुतळ्यावरून सोशल मीडियात हास्यरंग! title=

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध मेणाच्या पुतळ्यांचं संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँमध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही मेणाचा पुतळा दिसणार आहे. 

लंडनसह सिंगापूर, हाँगकाँग आणि बँकॉकच्या मादाम तुसाँ संग्रहालयात त्याच्या पुतळ्याचं अनावऱण करण्यात येणार आहे. २८ एप्रिलला एकाचवेळी या सर्व चार पुतळ्यांचं अनावरण करण्यात येणार आहे.

मेणाचा पुतळा बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर मोदी स्वत: लक्ष ठेवून होते. लंडनला हा पुतळा रवाना करण्यापूर्वी दिल्लीत मोदींना दाखवण्यात आला होता.