पुतिन यांना धक्का, पक्ष पन्नास टक्‍के

रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्या शक्तिशाली प्रतिमेला तडा गेला असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांना पन्नास टक्के मते मिळाली आहेत.

Updated: Dec 6, 2011, 07:35 AM IST

झी २४ तास वेब टीम, मॉस्को 

 

रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांच्या शक्तिशाली प्रतिमेला बारा वर्षांत प्रथमच धक्का बसला आहे. रशियन संसदेत, 'स्टेड डुमा'मध्ये पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे.  96 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यापैकी अवघी पन्नास टक्‍के मते पुतिन यांच्या पक्षाला मिळाली.

 

मार्चमध्ये रशियात अध्यक्षांची निवड होणार आहे. कनिष्ठ सभागृहातील बहुमत कायम ठेवून ही निवडणूकही जिंकण्याची त्यांची राजकीय मनीषा आहे. मात्र, लोकांनी दिलेला राजकीय धक्का खुद्द पुतिन यांच्यासह त्यांचे राजकीय वारसदार दिमित्र मेदवेदेव यांनाही विचारात घ्यावा लागणार आहे.  कम्युनिस्ट पार्टी ऑफ रशियन फेडरेशन (केपीआरएफ) या पक्षाला 92 जागा मिळाल्या आहेत. त्यांच्या जागांमध्ये 35 ने वाढ झाली आहे. असे असलेतरी  बहुमतात  घट झाली आहे. साडेचारशे सदस्यांच्या डुमा'मध्ये पुतिन यांच्या पक्षाला 238 जागा मिळाल्या.

 

आतापर्यंत 96 टक्के मतांची मोजणी पूर्ण झाली. त्यापैकी अवघी पन्नास टक्‍के मते पुतिन यांच्या पक्षाला मिळाली. पुतिन यांच्यासाठी हा विजयही मानहानिकारक ठरला आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळविले होते.