अमेरिकेतून इतिहास चोरीला जातो तेव्हा...

अमेरिकेत इतिहासाचीच चक्क चोरी झाली आहे. हा इतिहास चोरला कोणी याची माहिती घेण्याचा शोध सुरू झाला आहे. कॅलिफोर्निया येथे चोरांनी चक्क पर्वतराजींमध्ये असलेल्या प्राचीन लेण्यांवर डल्ला मारला आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 27, 2012, 09:06 AM IST

www.24taas.com,कॅलिफोर्निया
अमेरिकेत इतिहासाचीच चक्क चोरी झाली आहे. हा इतिहास चोरला कोणी याची माहिती घेण्याचा शोध सुरू झाला आहे. कॅलिफोर्निया येथे चोरांनी चक्क पर्वतराजींमध्ये असलेल्या प्राचीन लेण्यांवर डल्ला मारला आहे.
चार लेण्यांची चोरी झाली असून काही लेण्यांचे नुकसान झाले आहे. लाव्हा रसातून तयार झालेल्या या पवर्तराजीतील काही गुहांमध्ये सुमारे ३५०० वर्षांपूर्वीच्या मानवी संस्कृतीचे अवशेष जतन करून ठेवले होते. मात्र, या जतन केलेल्या नेण्यांना लक्ष करण्यात आल्याने अमेरिकेची सुरक्षा बोगस असल्याचे या निमित्ताने पुढे आलेय.
कॅलिफोर्नियातील पर्वतराजींमध्ये असलेल्या प्राचीन लेण्यांवर डल्ला मारण्यासाठई विजेवर चालणार्या् करवतींचा वापर कण्यात आला. चोरट्यांनी या लेण्या चोरून नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
या लेण्यांमध्ये मानवी संस्कृतीचे जतन करताना काही प्राण्यांचे तसेच तत्कालीन काही प्रसंग कोरून ठेवले होते. या लेण्या अमेरिकेच्या दृष्टीने प्राचीन वारसा होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या प्राचीन लेण्यांना खूप मोठी किंमत मिळण्याची शक्यता आहे.