Video: बांग्लादेशमधील सेक्स, गुलामगिरी आणि ड्रग्ज

बांग्लादेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा कुंटणखाना येथे चालतो. १५०० महिला आणि मुली शरीर विक्री करतात. येथे गरीबी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. सेक्स, गरीबी आणि ड्रग्ज असेच येथील बांग्लादेशी कुंटणखानासंदर्भात दिसतेय. 

PTI | Updated: Sep 24, 2015, 06:32 PM IST
Video: बांग्लादेशमधील सेक्स, गुलामगिरी आणि ड्रग्ज  title=

ढाका : बांग्लादेशात वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे. हे एक मुस्लीम राष्ट्र आहे. देशातील सर्वात मोठा कुंटणखाना येथे चालतो. १५०० महिला आणि मुली शरीर विक्री करतात. येथे गरीबी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे. सेक्स, गरीबी आणि ड्रग्ज असेच येथील बांग्लादेशी कुंटणखानासंदर्भात दिसतेय. 

गरिबीमुळे अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ओढले जात आहे. येथे लैंगिक गुलामगिरीच्या अनेक मुली बळी पडल्यात. येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्या ठिकाणाची पाहणी केली असता धक्कादायक बाबी पुढे आल्यात. सर्वकाही उघड्यावर पडल्याचे दिसते. वस्ती ही नावापुरतीच दिसून येते. येथे बजबजपुरीच अधिक दिसते. येथे चक्क मानवी तस्करी, अल्पवयीन वेश्याव्यवसायाला खतपाणी घातल्याचे चित्र दिसत आहे. येथे आरोग्याच्या सोयी-सुविधा दिसत नाहीत. बांग्लादेशी कुंटणखाना ही एक येथील समस्या होत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.