VIDEO : पृथ्वी फिरायची थांबल्यास काय होईल, पाहा...

मुंबई : दिवसाला आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात.

Updated: Feb 23, 2016, 10:40 AM IST
VIDEO : पृथ्वी फिरायची थांबल्यास काय होईल, पाहा...  title=

मुंबई : दिवसाला आपल्या डोक्यात अनेक विचार येत असतात. आपले काम, आपले मित्र, आपला अभ्यास, आपला प्राणी असे अनेक प्रकारचे हे विचार असतात. पण, या गोष्टी एका क्षणात थांबू शकतात. त्याला कारण ठरू शकते पृथ्वीचे परिक्रमण अचानक थांबणे. म्हणजेच पृथ्वी स्वतःभोवती फिरायची थांबणे.

आपला रोजचा दिवस इतका सारखा असतो की आपण पृथ्वीचा कधी विचारही करत नाही. पण, हीच आपली पृथ्वी साधारण ३०० - ४०० मीटर प्रति सेकंद इतक्या प्रचंड वेगाने स्वतःभोवती फिरत असते. याच प्रचंड वेगामुळे पृथ्वीवरील सर्व घटना सामान्यपणे घडत असतात. पृथ्वीचे थांबणे मानवजातीसाठी आणि एकूणच जीवसृष्टीसाठी विनाशकारी ठरू शकते.

 

पृथ्वी फिरायची थांबल्यास प्रचंड वेगाने वारे वाहू लागतील. माणसाच्या वजनाला काही अर्थच राहणार नाही. मानव आणि इतर प्राणी हवेत उडू लागतील. हवेत असणाऱ्या विमानांना आपण कोणत्यातरी मोठ्या वादळाचा सामना करतोय की काय, असे वाटेल.

पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाकडील लोकांना सुरुवातीला त्रास होणार नाही; पण, नंतर तिथे एखाद्या अणुबॉम्बचा विस्फोट झाल्यासारखे वारे वाहू लागतील. या घर्षणामुळे भयंकर आगी लागतील आणि तेथील जीवसृष्टीच्या विनाशाला सुरुवात होईल.

पृथ्वीवर दिवस आणि रात्री ३६५ दिवसांच्या होतील. पृथ्वीच्या चुंबकीय लहरींवरही परिणाम होईल. पृथ्वीच्या ध्रुवांवर गुरुत्वाकर्षण वाढल्याने सर्व महासागर ध्रुवांच्या दिशेने प्रवाही होतील आणि संपू्र्ण धरतीवर उंचच उंच त्सुनामी येतील.  

पृथ्वी समजा एक सेकंद जरी फिरायची थांबली तरी ८०० मीटर प्रति तास वेगाने सर्वच्या सर्व गोष्टी पूर्व दिशेने फेकल्या जातील.