फिल्म रिव्ह्यू : 'अॅक्शन जॅक्सन'चा अजय देवगण तडका!

प्रभूदेवा दिग्दर्शत  अॅक्शन जॅक्सन हा सिनेमा तेलगू फिल्म 'डुकुडू'चा रीमेक आहे. फूल ऑन अॅक्शन, ढिश्श्यूम ढिश्श्यूम आणि जबरदस्त स्टंट्स आपल्याला या सिनेमात पहायला मिळतील. अजय देवगन आणि सोनाक्षी सिंन्हा स्टार असलेल्या या सिनेमात अजय देवगननं आपल्या नेहमीपेक्षा आणखी काही हटके करायचा प्रयत्न केलाय आणि ते म्हणजे 'अॅक्शन जॅक्सन'मधला त्याचा डान्स... खरंतर अजय देवगणसारख्या स्टारकडून हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच सरप्राईस ठरणार आहे.

Updated: Dec 5, 2014, 06:29 PM IST
फिल्म रिव्ह्यू : 'अॅक्शन जॅक्सन'चा अजय देवगण तडका! title=

सिनेमा : अॅक्शन जॅक्सन
दिग्दर्शक : प्रभू देवा
संगीत : हिमेश रेशमिया
कलाकार : अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, यामी गौतम, मनस्वी मामगै आणि आनंद राज
वेळ : १४४ मिनिटे

मुंबई : प्रभूदेवा दिग्दर्शत  अॅक्शन जॅक्सन हा सिनेमा तेलगू फिल्म 'डुकुडू'चा रीमेक आहे. फूल ऑन अॅक्शन, ढिश्श्यूम ढिश्श्यूम आणि जबरदस्त स्टंट्स आपल्याला या सिनेमात पहायला मिळतील. अजय देवगन आणि सोनाक्षी सिंन्हा स्टार असलेल्या या सिनेमात अजय देवगननं आपल्या नेहमीपेक्षा आणखी काही हटके करायचा प्रयत्न केलाय आणि ते म्हणजे 'अॅक्शन जॅक्सन'मधला त्याचा डान्स... खरंतर अजय देवगणसारख्या स्टारकडून हे त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच सरप्राईस ठरणार आहे.

अभिनय : 
अजय देवगण या स्टारची आपली एक वेगळीच स्टाईल आहे, वेगळा अंदाज आहे आणि या सगळ्या गोष्टी प्रकर्षानं यात जाणवतं. या सिनेमात तो आपल्या डान्सच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना सरप्राईस तर करणार आहेच पण याचबरोबर या फिल्ममध्ये काही अॅक्शन सिक्वेन्समध्येही खूप नाविन्य पहायला मिळणार आहे. अॅक्शन असो, कॉमेडी असो, किंवा डान्स असो... 'हम भी किसी से कम नही' हे अजय देवगणनं या सिनेमातून पुन्हा एकदा दाखवून दिलंय.
 
सोनाक्षी सिंन्हाच्या भूमिकेत तसं काहीत नाविन्य पहायला मिळत नाही.  एका यंग, उत्साही, बबली मुलीची व्यक्तिरेखा तिनं यात साकारली आहे. खरं तर या आधीही सोनाक्षीनं अशा प्रकारची भूमिका बजावली आहे. त्यामुळे 'अॅक्शन जॅक्सन' हा सिनेमा पहायचा तो केवळ आणि केवळ अजय देवगणसाठी... अजय देवगणबरोबर आणखी एका व्यक्तीचा उलेख करावासा वाटतो तो म्हणजे अभिनेता आनंद राज... यात त्यानं नकारार्थी भूमिका साकारलीय पण, नेहमी प्रमाणे या सिनेमातही त्यानं बाजी मारलीय.  

दिग्दर्शन :
वॉन्टेड, रावडी राठोड, आर. राजकुमार सारखे सिनेमे देणारा दिग्दर्शक प्रभुदेवानं यात बरेच वेगळे प्रयोग करायचे  प्रयत्न केलेत आणि त्यात त्याला बऱ्यापैंकी यशही आलंय. 'अॅक्शन जॅक्सन' हा सिनेमा जरी रीमेक असला तरी त्याची हाताळणी ही प्रभूदेवा स्टाईनं करण्यात आलीय.   
 
संगीत :
हिमेश रेशमियानं संगीतबद्ध केलेल्या या सिनेमात आपल्याला पंजाबी स्टाईल फूट टॅपिंग गाणी जास्त ऐकायला मिळतात.
 
शेवटी काय तर...
या सिनेमा 'वन टाईम वॉच' असला तरी अजय देवगण आणि आनंद राज या दोघांच्या कडक परफॉर्मन्ससाठी या सिनेमाला आम्ही देतोय साडे तीन स्टार्स...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.