अपडेट : जामीन मिळाल्यानंतर सलमान घरी परतला!

अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आज जाहीर झालाय. हिट अँड रन प्रकरणी सलमान दोषी असून त्याला 5 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावलीय. 

Updated: May 6, 2015, 11:50 PM IST
अपडेट : जामीन मिळाल्यानंतर सलमान घरी परतला! title=

संध्याकाळी 7.20 - सलमान खान सेशन कोर्टाकडून घराकडे रवाना... 

संध्याकाळी 7.13 - पुढच्या १५ मिनिटात सलमान कोर्टाबाहेर येणार...सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रार कार्यालयात प्रक्रिया सुरू 

संध्याकाळी 7.05 - जामीनाची प्रत सेशन कोर्टात दाखल  सलमान खान काही वेळातच सेंशन्स कोर्टातून घरी निघणार ... दोन दिवस दिलासा... आता शुक्रवारी काय होणार याकडे सर्वांचंच लक्ष

संध्याकाळी 6.48 - सुनील शेट्टी सलमान खानच्या घरी पोहचला. 

संध्याकाळी 6.30 - जामीनासाठी वाट पाहात असलेल्या सलमान खानला कोर्टात दिला वडा पाव आणि कोल्ड्रिंक्स- ANI

संध्याकाळी 6.28 - सलमान जेलमध्ये जाणार नाही, अंतरिम जामीनाच्या आदेशाची प्रत सेशन्स कोर्टात पोहचली 

दुपारी - 04:47 -  सलमान खानला तात्पुरता दिलासा, सलमानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन मिळाला, परवा सुनावणी, आदेशाची प्रत हायकोर्टाला मिळण्यास उशीर झाला.

दुपारी 04:46 - पूर्व निकालाची प्रत तुमच्या हाती नाहीय, मग कशाचा आधारे आम्ही आदेश द्यायचे, हायकोर्टाचा सलमानच्या वकीलांना सवाल

दुपारी 04.33 - पोलिसांनी सलमान खानला वाचविण्याचा प्रयत्न केला म्हणून 13 वर्षे शिक्षा व्हायला लागली. प्रसिद्ध क्रिमिनल लॉयर हरीश साळवे मुंबई हायकोर्टात सलमान खानच्या जामीनाकरता युक्तीवाद  करत आहेत. 

दुपारी 04.20 - सलमानच्या जामीन अर्जावर हायकोर्टात सुनावणी

दुपारी 03.02 - सलमानच्या जामीनासाठी वकीलांना हायकोर्टात अर्ज केलाय. 

दुपारी 2.05 - ‪खोटी साक्ष देणारा सलमानचा ड्रायव्हरही पोलिसांच्या ताब्यात, अशोक सिंहवरही खटला चालणार

सलमानच्या शिक्षेनंतर बॉलिवूडच्या प्रतिक्रिया

आलिया भट्ट
तुमचे जवळचे चुकीचे जरी असले तरी त्यांना शिक्षा झाली तर खूप वाईट वाटते. पण आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि तुझ्यासोबत कायम आहे.

ऋषि कपूर
या कठीण प्रसंगी कपूर कुटुंबीय खान कुटुंबियांसोबत आहे. काळ हा सर्व घाव दूर करतो, गॉड ब्लेस

सोनाक्षी सिन्हा
धक्कादायक बातमी... काय बोलावे हे कळत नाही. पण सलमान खान सोबत आम्ही कोणत्याही परिस्थिती आहोत. तो चांगला माणूस आहे 

दुपारी 2.02 - सरकारी वकील प्रदीप घरत यांची प्रतिक्रिया - सलमानच्या ड्रायव्हरची साक्ष खोटी होती- कोर्ट

दुपारी 1.55- न्य़ायाधीश कोर्टातून निघाले, सलमानभोवती कुटुंबियांचा गराडा

दुपारी 1.53- सलमानला आर्थर रोड जेलमध्ये नेण्यापूर्वी जेजे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी नेणार 

दुपारी 1.49- 5 वर्षांचा कारावास आणि 25 हजार रुपयांचा दंड, 500 रुपये दंड मोटर व्हेईकल अॅक्ट अंतर्गत  

दुपारी 1.44- 10 मे पासून हायकोर्टाला सुट्टी असल्यामुळं जामीन मिळविण्यासाठी सलमानकडे 3 दिवसांचा अवधी

दुपारी 1.34- कोर्टाबाहेर पोलिसांची गाडी आली, ऑर्थर रोड जेलमध्ये नेणार

दुपारी 1.32- ऑर्थर रोड जेलमध्ये सलमानची रवानगी होणार

दुपारी 1.26- सलमानला 5 वर्षांची शिक्षा 

दुपारी 1.22 - सलमानला फुटला घाम, मागितले पाणी

दुपारी 1.22 - न्यायाधिश कोर्टात पोहोचले

Media preview

दुपारी 1.10 - अभिनेत्री प्रिती झिंटा आणि सोनाक्षी सिन्हा सलमानच्या घरी पोहोचल्या - ANI

Media preview

दुपारी 12.56 सलमानला दंडा आकारा, शिक्षा कमी करा, सलमानच्या वकिलांची मागणी 

दुपारी 12.50 - सलमानची पहिली गर्लफ्रेड अभिनेत्री संगिता बिजलानी सलमानच्या घरी पोहोचली

दुपारी 12.46 - सलमानची पहिली गर्लफ्रेड संगिता बिजलानी सलमानच्या घरी पोहोचली

दुपारी 12.37 - सोहेल खान घरी गॅलेक्सी अपार्टमेंटला पोहोचला, कोर्टातून कोणतीही प्रतिक्रिया न देता सोहेल निघाला होता.

दुपारी 12.30 -  सलमानला 1 वाजून 10 मिनीटांनी शिक्षा सुनावली जाणार

दुपारी 12.25 -  सरकारी वकीलांची सलमानला 10 वर्षाच्या शिक्षेची मागणी

दुपारी 12.20 -  सलमानच्या वकीलाचा युक्तीवाद संपला... सलमाननं 600 मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी मदत केली वकील श्रीकांत शिवदे यांचा युक्तिवाद 

दुपारी 12.18 - 

कोर्टरूमबाहेर पोलिस आणि मीडियात धक्काबुक्की, कोर्टाचं कामकाज थांबवलं 

गोंधळानंतर कोर्ट रुमचं दार बंद करुन पुन्हा एकदा कोर्टाचे कामकाज सुरु 

सलमानचं समाजकार्य पाहून त्याला 3 वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ नये, वकील श्रीकांत शिवदे यांचा युक्तिवाद–ANI

दुपारी 12.12 ।  सलमानविषयी मला सहानभूती, मी प्रार्थना करते की, त्याला जास्त शिक्षा होऊ नये: हेमामालिनी

दुपारी १२.०२ ।  माझी शिक्षा कमी करावी - सलमान खान 

दुपारी १२.०१ ।  दोषी सलमान खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सकाळी ११.५० । कोर्टाने दोषी ठरवल्याने सलमानच्या आईची प्रकृती बिघडली

सकाळी ११.४५ । कोर्टाच्या निर्णयानंतर सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलविरा रडल्या
कोर्टाने दोषी ठरवताच सलमानला रडू कोसळले

सकाळी ११.२१ । सलमानच्या शिक्षेवर कोर्टात युक्तीवाद सुरु । कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानच्या वकीलांकडून कोर्टात युक्तीवाद सुरू

सकाळी ११.२० । सलमानला किमान दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते, तुम्हाला काय म्हणायचे आहे : कोर्ट

सकाळी ११.१९ । सलमान खान गाडी चालवत होता आणि ते ही मद्यपान करुन, त्याचबरोबर सलमान खानवर करण्यात आलेले सर्व आरोप सुनावणीवरुन आणि उपलब्ध पुराव्यावरुन सिद्ध झाले आहे,  असे न्यायाधीश यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने सलमान खानला दोषी ठरवले.

सकाळी ११.१८ ।  सलमान खान दोषी - कोर्ट

सकाळी ११.१२ । सलमान खानवरील सर्व आरोप सिद्ध - कोर्ट

सकाळी ११.११ । सलमान खान गाडी चालवत होता - कोर्ट

सकाळी ११.०५ । सलमान खान सेशन कोर्ट रुममध्ये  दाखल

सकाळी १०.४५ । वाराणसीत सलमानसाठी नमाज

सकाळी १०.४१ । कानपूरमध्ये सलमानच्या सुटकेसाठी चाहत्यांची प्रार्थना आणि यज्ञ

सकाळी १०.१५ । सलमानचा भाऊ सोहेल खान आणि राजकीय नेते बाबा सिद्धिकी कोर्टात पोहोचलेत

सकाळी १०.१५ । सलमान दोषी आढळला तर मुख्य भूमिकेत असलेल्या चित्रपटांच्या माध्यमातून सुमारे २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक बुडण्याची शक्यता । अख्ख्या बॉलिवूडचं निकालाकडे लक्ष ।

सकाळी ९.५५ । सलमान खान कडेकोट बंदोबस्तात कोर्टाकडे रवाना

सकाळी ९.५३ । सलमान वडील सलीम खान यांच्यासोबत कोर्टात जाणार

 

सकाळी ९.५२ । सलमान खानचे मित्र आणि बिईंग ह्युमन सदस्य पोहोचले कोर्टात

सकाळी ९.५१ ।  सलमान खान घरातून बाहेर पडला । कोर्टाकडे झाला रवाना

सकाळी ८.३१ । सलमान खानच्या हिट अँड रनप्रकरणी पार्श्वभूमीवर सुरक्षितेसाठी कडेकोट बंदोबस्त  

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या हिट अँड रन प्रकरणाचा निकाल आज जाहीर होणार आहे. साधारणतः 11 वाजल्यानंतर कोणत्याही क्षणी हा निकाल येईल. २००२ मध्ये घडलेल्या या घटनेचा घटनेचा तब्बल १३ वर्षांनी निकाल येतोय.

या प्रकरणानं अनेक वळणं घेतलीयेत. घटना घडली तेव्हा सलमान गाडी चालवत होता का आणि त्यानं मद्यपान केलं होतं का, हे दोन प्रश्न कळीचे आहेत.  यासंदर्भात झालेले साक्षीपुरावे, उलटतपासण्या, लॅब रिपोर्ट आदीच्या आधारे कोर्टात या खटल्याचा फैसला होणार आहे. सलमानचे चाहते आणि बॉलिवूडचं या निकालाकडे लक्ष लागलंय.

सलमान खानवर सत्र न्यायालय फैसला सुनावणार आहे. या पार्श्वभूमूवर बॉलिवूडकरांनी सलमानची भेट घेतली. शाहरुख खाननंही रात्री 1च्या सुमारास सलमान खानच्या घरी गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन जवळपास एक तास त्याच्याशी चर्चा केली.रात्रभर सलमान खानच्या घरी अभिनेते, दिग्दर्शक आणि त्याच्या नातेवाईकांचा येण्याजाण्याचा सिलसिला सुरु होता.

दिग्दर्शक डेविड धवन, सलमानची बहीण अर्पिता आणि पती आयुष शर्मा, सोहेल खान, अतुल अग्ही होत्री, साजिद नाडियावाल, बाबा सिद्दीकी यांनीही सलमानच्या घरी हजेरी लावली.. तर सलमानच्या चाहत्यांनीही आज सकाळपासूनच सेशन कोर्टाबाहेर गर्दी केली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.