'रिंगण'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित

नवी दिल्लीत ६३व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात येत आहे. वृत्तवाहिनींनी दिलेल्या माहितीनुसार खाली यादी देण्यात आली आहे. 

Updated: Mar 28, 2016, 01:46 PM IST
'रिंगण'ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार घोषित title=

नवी दिल्ली : ६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची राजधानी दिल्लीत घोषणा करण्यात आलीये. सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान बाहुबलीने पटकावलाय. तर बिग बी अमिताभ बच्चन ठरले आहेत सर्वोत्कृष्ट अभिनेता. बॉलिवूडची क्वीन कंगना रॅनोटला सलग दुस-यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालायय बाजीराव मस्तानी फिल्मसाठी संजय लीला भन्साळींना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झालाय. ३ मे रोजी दिल्लीमध्ये या राष्ट्रीय पुरस्कारांचं वितरण होणार आहे. 

राष्ट्रीय़ पुरस्कारांमध्य़े मराठीडा झेंडा पुन्हा एकदा दिमाखात फडलाय. मराठी चित्रपटांमध्ये बाप-लेकाच्या संघर्षावर बेतलेल्या 'रिंगण' या चित्रपटाला सर्वोतकृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालाय. कट्यार काळाज घुसली, नटसम्राट यासारख्या बड्या चित्रपटांना मागे टाकून रिंगणनं बाजी मारलीय. तर कट्यार काळाजात घुसली या चित्रपटासाठी महेश काळेला सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झालाय.  

याव्यतिरिक्त नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या चित्रपटाची अभिनेत्री रिंकू राजगुरू विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झालाय. तर उत्कृष्ट शैक्षणिक लघुपटासाठी मिथुनचंद्र चौधरी यांच्या पायवाट या राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय. 

राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेली यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट - बाहुबली द बिगिनिंग 
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन - संजय लीला भंसाळी (बाजीराव मस्तानी)
सर्वोत्कृष्ट अभिनेता - अमिताभ बच्चन (पिकू)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - कंगना राणावत (तन्नू वेड्स मन्नू २) 
चित्रपट प्रेमी राज्य - गुजरात
उत्कृष्ट शैक्षणिक चित्रपट - पायवाट
बेस्ट शॉर्ट फिल्म - अमोल देशमुख - औषध 
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट - रिंगण
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट - दम लगा के हैशा
कोरिऑग्राफी -  रिमो डिसुझा - बाजीराव मस्तानी
बेस्ट ज्युरी - कल्की
लिरीक्स - वरुण ग्रोव्हर - मोह मोह के धागे
सुजीत सावंत - प्रॉडक्शन डिझाईन - बाजीराव मस्तानी
संवाद - जुही चतुर्वेदी -पिकू, हिमांशू शर्मा - तन्नू वेड्स मन्नू २
सर्वोत्कृष्ट गायक - महेश काळे (कट्यार काळजात घुसली)
सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट - बजरंगी भाईजान
विशेष पुरस्कार - बाहुबली
स्पेशल मेन्शन - रिंकू राजगुरू (सैराट)